सुप्रिया सुळे पहिल्या महिला मुख्यमंत्री चालतील का? चंद्रकांत पाटलांनी दिलं उत्तर

Chandrakant Patil answer the possibility of Supriya Sule will become first woman Chief Minister
Chandrakant Patil answer the possibility of Supriya Sule will become first woman Chief Minister

पुणे - भाजप नेते आशिष शेलार यांनी एका कार्यक्रमात कर्तृत्ववान मराठा महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री व्हावी अशी अपेक्षा मंचावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर व्यक्त केली होती. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या तर चालतील का? असा प्रश्न विचारण्यात आला. ऑल इंडिया जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे आयोजित नवदुर्गा सन्मान सोहळ्यामध्ये चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, ''कर्तृत्ववान महिला, जिचा दावा आहे, अशा महिलेचा प्रस्ताव असेल तर कोणालाही मान्य होईल.'' ''राज्यात महिला मुख्यमंत्री व्हायलाच हवी. पण महिला सरपंचासारखं महिला मुख्यमंत्र्यांचे होऊ नये. महिला सरपंच झाली की गावाचा कारभार नवरा चालवतो.'' अशी परिस्थिती होऊ नये असंही पाटील यांनी म्हटलं.
 
दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे संपादित कर्तृत्ववान मराठा स्त्रिया या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या प्रकाशन सोहळ्यावेळी  भाजप नेते आशिष शेलार यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा राज्यभर रंगली आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव उपस्थित होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

ज्ञानेश महाराव यांनी यावेळी आशिष शेलार यांचा उल्लेख महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असा केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याशिवाय शरद पवार यांना देशाचे नेते असंही त्यांनी संबोधलं होतं. महाराष्ट्रातील कर्तृत्ववान मराठा स्त्रियांवर मुंबई विद्यापीठात संशोधनाची गरज असल्याची अपेक्षा आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com