पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटील सांभाळणार जबाबदारी

File photo of Chandrakant Patil
File photo of Chandrakant Patil

पुणे: जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची नेमणूक झाली आहे. गिरीश बापट हे लोकसभेला निवडून गेल्याने हे पद रिक्त झाले होते. तर जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे.

पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी आपल्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.4) मुख्यमंत्री यांच्याकडे दिला, त्यामुळे पुण्याचे नवे पालकमंत्री कोण? अशी चर्चा पुन्हा रंगली होती. या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला असून त्याठिकाणी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्याकडील जळगावच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार कमी करून तो जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे. जळगावच्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदासाठी अनेक आमदारांची नावे चर्चेत होती. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार महिन्यांचा कालावधी आहे. या चार महिन्यांसाठी पुण्यातून नाव दिले तर एका आमदाराच्या पारड्यात झुकते माप दिल्यास रुसवे फुगवे होऊ शकतात. अशातच गटातटाचे राजकारण निर्माण होऊ शकते, अशी शक्‍यता धरून शहरातून पालकमंत्री न देता चंद्रकांत पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com