esakal | फडणवीसांनी कष्टाने मिळवून दिलेले आरक्षण, या सरकारने टिकवलं नाही : चंद्रकांत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil gives Statement about Reservation

कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अशी गंभीर परिस्थिती कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात होती. या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती. अशी टिका चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या कारभारावर केली.

फडणवीसांनी कष्टाने मिळवून दिलेले आरक्षण, या सरकारने टिकवलं नाही : चंद्रकांत पाटील

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : ''तेरा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर नको ती लोकं एकत्र आली. सर्वात जास्त आमदार निवडून येऊनही भाजप विरोधी पक्षात राहिली. त्या सरकारला आता एक वर्ष पूर्ण झाली. या एक वर्षात सामान्य माणूस पूर्णपणे भरडला गेला आहे. महिला अत्याचार, मराठा आरक्षण गोंधळ असा सर्व प्रकार या सरकारच्या काळात पहायला मिळाला.'' अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील महाविकास सरकारच्या कारभारवर केली. आघाडीच्या सरकाराची काल (ता.28) वर्षपुर्ती झाली. आज पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होती.

कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात
''कोरोनाचे मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण महाराष्ट्रात आहे. जगातले पाच देश सोडले तर सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अशी गंभीर परिस्थिती कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात होती. या काळात आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली होती.'' अशी माहिती यावेळी बोलताना दिली.

कोरोना रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी
''कोरोनाच्या काळात सरकार अपयशी ठरले आहे''असे सांगत पाटील म्हणाले, टटया सरकारच्या काळात सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. अनेक शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले नाही. शिक्षण क्षेत्राचा बट्ट्याबोळ झाला आहे. कोणी म्हणत आज शाळा सुरू होईल, कोणी म्हणत होणार नाही. तोच गोंधळ आता दहावीच्या परिक्षेवरून सुरू आहे. शिक्षण क्षेत्राची अवस्था वाईट झाली आहे.''

संजय राऊत हे खूप मोठे व्यक्तिमत्त्व 
यावेळी संजय राऊत यांच्याबद्द्ल विचारले असता ते म्हणाले, संजय राऊत खूप मोठे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याबद्दल मी अलीकडे बोलणे बंद केले आहे. ''सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे'', असेही ते म्हणाले. 

सरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे केले 
महाविकास आघाडीसरकारने मराठा आरक्षणाचे मातेरे करून टाकले. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कष्टाने आरक्षण मिळवून दिले होते, पण या सरकारला हे आरक्षण टिकवता आली नाही. शिक्षणातील आरक्षण यांनी आता रद्द केले. सरकार येतील आणि जातील पण, महाराष्ट्र संतांनी सामाजिक एकतेची जी विन विणली होती त्याला धक्का लावण्याचे काम मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू आहे.
 

loading image