chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools
chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools Sakal

Chandrakant Patil : कसबा-चिंचवड निवडणुकीसाठी भाजपची बैठक; 'आमची घोषणा गल्लीत नाही तर...'

चंद्रकांत पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी बोलवली बैठक

पुण्यात कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणुका जाहीर झाल्या. 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या पोटनिवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर या जागेवर भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार याची चर्चा आहे. या पोटनिवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, माजी आमदार जगदीश मुळीक या पोटनिवडणुकीचे नेतृत्त्व करणार आहेत. हक्काचा मतदार संघ असूनही जोरदार तयारी करणार. आम्ही आमच्या कार्य पद्धतीनुसार कामाला लागलो आहोत. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार असून उमेदवारबाबत निर्णय कोरकमिटी घेणार आहे. आजच्या बैठकीत उमेदवाराबाबत चर्चा झाली नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

chandrakant patil said dr babasaheb ambedkar Bhaurao Patil mahatma phule begged for schools
Kasba Peth Bypoll Election : चंद्रकांत पाटलांनी पोटनिवडणुकीसाठी बोलवली बैठक; भाजपचा उमेदवार आज ठरणार?

तर सर्व पक्षांनी निवडणूक होणार हे सूचित केल्यानंतर आम्ही तयारी सुरू केली आहे. निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असून आम्ही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध केली. महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली जाणार असल्यामुळे आम्ही गाफील राहणार नाही. इच्छुक उमेदवाराची नावे पाठवण्यात येतील त्यातील तीन नावे निवडून विचार केला जाईल असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

हे ही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

तर पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमची घोषणा गल्लीत नाही तर दिल्लीतून होते. आम्ही प्रयत्न करू ही जागा बिनविरोध करण्यासाठी त्याचबरोबर दिल्लीतून नावे जाहीर केली जातील असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com