
पुणे : पावसाळी अधिवेशनात अतिशय चांगल्या प्रकारे कामकाज झाले. राज्य सरकारने अनेक विधेयके मंजूर केली. राज्याला पुढे नेण्यासाठी विकासाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे निर्णय झाले आहेत. पण विधिमंडळाच्या आवारातील आमदारांमधील वादावादी, कार्यकर्त्यांमधील मारामारीमुळे अधिवेशनाला गालबोट लागले. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्रवेश करण्यासाठीची नियमावली कडक केली जाणार आहे, असे संसदीय कामकाज, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.