Chandrakant PatilSakal
पुणे
Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन
Sakal Study Room : ‘सकाळ प्लस स्टडीरूम’ ई-पेपरच्या प्रकाशनप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणाचा मूलमंत्र दिला.
पुणे : ‘‘एकीकडे अधिकाऱ्यांची बदली होऊ नये म्हणून मोर्चे काढले जातात, तर दुसरीकडे अधिकाऱ्याच्या बदलीसाठी मोर्चे काढले जातात. त्यामुळे कोणते अधिकारी व्हायचे हे तुम्ही ठरवा. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एक व्हिजन समोर ठेवून काम केले तर समाजाचा सर्वांगीण विकास होतो,’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच ‘‘प्रामाणिकपणा हा सरकारी नोकरीत महत्त्वाचा आहे,’’ असा मूलमंत्रही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.