
Chandrakant Patil : सध्याचे सरकार संवेदनशील सरकार आहे- चंद्रकांत पाटील
खडकवासला : राज्य सरकारच्या माध्यमातून थोर- महापुरुषांचे कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी साहित्य मंडळाची स्थापना केली असून त्या लेखकांना महापुरूषांविषयी लिहण्यास सरकारने प्रोत्साहन देत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांच्या सह पाच सहा व्यक्तींचा नावाचा समावेश आहे.
अशा प्रकारे आमचे सरकार संवेदनशील आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानच्या वतीने कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात २२ व्या साहित्यिक कलावंत संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
त्यावेळी पाटील बोलत होते. या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. स्वागताध्यक्ष माजी उपमहापौर दिलीप बराटे आहेत. माझ्याकडे ग्रंथालय संचनालाय विभाग माझ्याकडे आहे. राज्यात २७ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यातील १२ हजार गावात ग्रंथालय आहेत. १५ हजार म्हणजे ग्रामपंचायत असलेल्या गावात ग्रंथालय सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी सत्तेत आल्यावर २०१२ पासून बंद असलेली ग्रंथालय नोंदणी पुन्हा सुरू केली.
तसेच, वाचन संस्कृतीला पाठबळ देणाऱ्या अ, ब, क, आणि ड वर्गवारीनुसार ग्रंथालयांना आम्ही सक्षम आणि सशक्त करण्याच्या दृष्टीने त्यांच्या अनुदानात ६० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला.
लतादीदींच्या संगीत विश्वविद्यालय
मुंबईत लतादीदींच्या नावाने महाविद्यालय सुरू केले आहे. सांताक्रूझ येथे कलिना कॅम्पस मध्ये ७० हजार चौरस फूट जागा देऊन तेथे त्यांच्या नावाने संगीत विश्वविद्यालय सुरू करणार आहे.
शिक्षण सेवकाचे मानधन वाढले
शिक्षण सेवकांचे मानधन सध्या १६ हजार होते ते आता आम्ही २८ हजार केले आहे. शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात पैसा कसा वाढेल. यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. असून सांताक्रुझ येथे 70 हजार चौरस फुटांवर संगीत विश्वविद्यालयाची स्थापना करीत आहोत.
बराटेंचे केले कौतुक
माजी उपमहापौर दिलीप बराटे यांनी राजकारणी असून गेली सलग २२ वर्षे साहित्यिक कलावंत संमेलन सुरू ठेवले आहे. साहित्यिक आणि कलेचा संगम केला आहे. साहित्य व कलेला राजाश्रय दिला आहे.
कोथरूडला आता एकांकिका स्पर्धा
आम्ही आता कोथरूडमध्ये फिरते ग्रंथालय सुरू केले आहे. त्यानंतर आता कोल्हापूरला देखील फिरते ग्रंथालय सुरू केले आहे. कोथरूड मध्ये कॉलनी अंतर्गत एकांकिका स्पर्धा आयोजित करणार आहे. अशी घोषणा ही पाटील यांनी केली आहे.