
पुणे - राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर अखेर राज्य मंत्री मंडळाचे खातेवाटप आज (ता. २१) रात्री जाहीर झाले. यामध्ये पुणे जिल्ह्याच्या वाट्याला दमदार खाती आलेली आहेत. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन खाते आले असून, त्याचा फायदा जिल्ह्यातील २१ आमदारांना होऊ शकतो. तर भाजपने नगरविकास राज्यमंत्रिपद पुण्याकडे दिलेले आहे.