esakal | Video : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

Video : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले...

गोयल यांच्याकडून दोघांच्या गुणांची तुलना

- संजय राऊत यांच्या विधानाबाबत संभ्रम

Video : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आम्ही पाडणार नाही. पण ते आपणहून पडेल. मात्र, सरकार कधी पडेल हे सांगायला मी भविष्यकार नाही, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज (गुरुवार) स्पष्ट केले. तसेच मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही, असेही ते म्हणाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदाच्या निवडीबाबत आकुर्डी येथे पक्षाच्या सर्व नगरसेवकांची बैठक झाली. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील हे बोलत होते. माजी मंत्री विनोद तावडे, नवनिर्वाचित शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा ढोरे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी आदी यावेळी उपस्थित होते. 

उदयनराजे भोसले यांच्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याबद्दलही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन कुख्यात तस्कर करीमलाला-इंदिरा गांधी यांच्या संबंधाबद्दल त्यांच्या वक्तव्याची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. 

गोयल यांच्याकडून दोघांच्या गुणांची तुलना

भाजप कार्यकर्ते जयभगवान गोयल यांच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि नरेंद्र मोदी यांच्या तुलनात्मक पुस्तकावरुन उठलेल्या वादंगाबद्दल पाटील यांनी राष्ट्रपुरुषाबद्दल तुलना करु नये. मात्र, ज्यावेळेस त्या राष्ट्रपुरुषाला कमी लेखून तुलना केली जाते. त्यावेळेस ती चुकीची मानली जाते. गोयल यांनी पुस्तकात दोघांमध्ये असलेल्या गुणांची तुलना केली आहे, असे सांगत पुस्तकाबद्दल सारवासारव केली. 

संजय राऊत यांच्या विधानाबाबत संभ्रम

संजय राऊत यांनी चुकून हे विधान केले की त्यांना भ्रम झाला आहे. हे कळायला मार्ग नाही. दोन्ही पक्षांमध्ये पंगा आहे तो चालू द्या. परंतु, थेट शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोचता? त्यांनी केवळ अपमानजनक शब्द अपुरा पडेल असे वक्तव्य केले आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या प्रकारामुळे शिवप्रेमी कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही पक्षाकडून आम्ही गावोगाव निषेध कार्यक्रम करु. कुख्यात तस्कर करीमलाला आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दलच्या त्यांच्या वक्‍तव्याची देखील चौकशी झाली पाहिजे.

अमराठी लोक बांग्लादेशी की पाकिस्तानी?

शिवसेना आणि भाजप यांची विचारधारा एक आहे. मात्र, आम्ही कुणाची वाट पाहत नाही. आमचे काम चालूच आहे. मनसेकडून युतीसाठी अद्याप प्रस्ताव आलेला नाही. मात्र, राज्यात 80 टक्के नोकऱ्या स्थानिक लोकांना दिल्यावर 20 टक्के लोकांमध्ये परप्रांतीय असतील काय? परप्रांतीय हे बांग्लादेशी की पाकिस्तानी आहेत? याबद्दल, मनसेला प्रस्ताव पाठविताना विचार करावा लागेल. तसेच युतीसाठी मनसेला त्यांची अमराठी भाषिकांबद्दलची भूमिका बदलावी लागेल, असेही पाटील म्हणाले.