esakal | Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant-vchandrkant.jpg

Vidhan Sabha 2019 : कोथरूड मधून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंडाचे निशान फडकावित अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Vidhan Sabha 2019 : कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे

sakal_logo
By
विनायक बेदरकर

Vidhan Sabha 2019 : कोथरूड : कोथरूड मधून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी बंडाचे निशान फडकावित अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील विरुद्ध चंद्रकांत मोकाटे असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघात या निवडणुकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अचानक एन्ट्री मारल्याने कोथरूड मधील सर्वच पक्षाच्या राजकीय कार्यकर्ते अचंबित झाले आहेत.

कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार आयात केला जात असल्याने त्याला विरोध आणि शिवसेनेला जागा सुटली नसल्याने कोथरूड मध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची विरोधकांची मोट बांधीत मनसेलाही सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोकाटे मनसे कडूनही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे मनसेच्या गोटा मध्येही चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे.

भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर चंद्रकांत मोकाटे त्यांचा निर्णय जाहीर करणार असल्याचे मोकाटे यांनी सकाळची बोलताना सांगितले.

loading image
go to top