Vidha Sabha 2019 : सुख, आनंद, सुरक्षितता हीच प्राथमिकता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

‘‘सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची नेहमीची प्राथमिकता असून, यासाठी आम्ही आनंदी विभाग या विषयावर काम करत आहोत. आपल्या राज्याचा हॅपिनेस इंडेक्‍स सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू,’’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

विधानसभा 2019  
कोथरूड विधानसभा मतदारसंघ

पुणे - ‘‘सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची नेहमीची प्राथमिकता असून, यासाठी आम्ही आनंदी विभाग या विषयावर काम करत आहोत. आपल्या राज्याचा हॅपिनेस इंडेक्‍स सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू,’’ असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले. 

नवचैतन्य हास्य क्‍लबच्या वतीने आशिष गार्डन येथे आयोजित हास्य योग कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शिवसेनेचे श्‍याम देशपांडे, हास्य क्‍लबचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, रामानुजदास मणियार, सुनील देशपांडे, जयंत दशपुत्रे, समन्वयक संदीप खर्डेकर यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रचाराच्या धकाधकीत असणाऱ्या पाटील यांनी या कार्यक्रमात हास्ययोगाची प्रात्यक्षिके करून ताण हलका केला. ते म्हणाले, ‘‘आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील प्रत्येक व्यक्ती सुख आणि आनंदासाठी धडपडत आहे. महायुती सरकारने पाच वर्षांत राज्यातील ग्रामीण जनतेचं आयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या. त्यामुळे ग्रामीण शहरी भागातील जनता आज समाधान व्यक्त करत आहे.’’

बापट म्हणाले, की ‘‘आयुष्यात सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत जे काम केलं आहे, त्यावर समाजातील प्रत्येक घटक आज समाधान व्यक्त करत आहे.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandrakant Patil was speaking at the Yash Yoga event organized at Ashish Garden