

maratha reservation
esakal
Manoj Jarange Patil: कुणबी प्रमाणपत्र रद्द करावयास लावल्याच्या आरोपावरुन मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या काही दिवसांपासून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. जरांगे पाटलांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सध्या सुरु आहे. या दौऱ्यात ते सातत्याने बावनकुळेंवर तोफ डागत आहेत. त्याला आता बावनकुळे यांनी उत्तर दिलंय. ते पुण्यात बोलत होते.