Chandrayaan-3 : चंद्रयान पृथ्वीभोवती स्थिरावले, या दिवशी जाणार चंद्राकडे

भारताची महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम असलेले ‘चंद्रयान -३’ शुक्रवारी (ता.१४) प्रक्षेपणानंतर दुपारी दोन वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले.
Chandrayaan-3
Chandrayaan-3sakal

पुणे - भारताची महत्त्वाकांक्षी अवकाश मोहीम असलेले ‘चंद्रयान -३’ शुक्रवारी (ता.१४) प्रक्षेपणानंतर दुपारी दोन वाजून ४६ मिनिटांच्या सुमारास पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावले आहे. इस्त्रोच्या बाहुबली रॉकेटने अर्थात ‘एलएमव्ही’ने त्याला पृथ्वीपासून १७९ किलोमीटर अंतरावर सोडले असून, तेथून चंद्रयान-३ पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार घिरच्या मारणार आहे.

चंद्रयान ३ मिशन काय आहे?

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यासाठीचा हा भारताचा अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) दूसरा प्रयत्न असेल. या आधी चंद्रयान२ च्या माध्यमातून हा प्रयत्न करण्यात आला आहे. आजवर या ठिकाणी कुठलेही यान पोहोचले नाही. म्हणून संपूर्ण जगभरातील शास्त्रज्ञान करिता चंद्रयान ३ मोहीम अत्यंत महत्त्वाची व मोठी अशी ठरणार आहे. तसेच देशातील तंत्रज्ञान किती प्रमाणात विकसित आहे, हे दाखवण्याची संधी भारताला मिळालेली आहे.

प्रक्षेपक यान एलव्हीएम...

इस्रोच्या सर्वात ताकदवर यांनांपैकी एक म्हणजे एल व्ही एम ३ प्रक्षेपण यान. ‘चंद्रयान ३’ मध्ये रोव्हर , लेंडर आणि प्रॉपलशन मोड्युल असल्यामुळे त्यांना स्वतः अंतराळात प्रवेश करता येत नाही. म्हणून या प्रक्षेपकाला ते जोडण्याचे कारण आले आहे. एल व्ही एम ची उंची ४३.५० मीटर आहे. तर याचे वजन ६४० टन आहे. एल व्ही एम मध्ये ८ ते ९ हजार किलोग्रॅम वजन पेलण्याची क्षमता आहे.

भारतातील सर्वाधिक वजन असणारे प्रक्षेपण यान म्हणून एल व्ही एम ओळखले जाते. एल व्ही एम चे तीन स्तर आहेत. ५ जून २०१७ रोजी या प्रक्षेपण यानाच्या साहाय्याने इस्रो ने सतीश धवन अंतराळ केंद्रातून ' जी एस एल व्ही एम के 3 'पहिली कक्षा चाचणी प्रक्षेपित केली होती. 'चंद्रयान 2' चे प्रक्षेपणही 2019 मध्ये याच प्रक्षेपण अस्त्राद्वारे झाले होते.

'एल व्ही एम 3' मध्ये कमी उंचीच्या कक्षेत उपग्रह प्रक्षेपित करण्याची क्षमता प्रदर्शित करण्यात आली आहे. यामध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत म्हणून मानवी मोहिमांसाठी हे उपयुक्त असल्याचे, इस्रो कडून सांगण्यात आले आहे. म्हणून 'एल व्ही एम 3' च्या मदतीने ब्रिटन स्थित वन वेब ग्रुप कंपनीचे ३६ इंटरनेट उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले होते.

चंद्रयान ३ ची वैशिष्ट्ये काय?

'चंद्रयान १'व 'चंद्रयान २' हे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करणार होते . तर 'चंद्रयान 3' हे प्रत्यक्षात चंद्रावर उतरून आणि तेथील परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. 'चंद्रयान 3' हे 'चंद्रयान 2' सारखेच असणार आहे. परंतु यावेळी फक्त लॅन्डर ,रोवर आणि प्रोपलशन मॉडेल असणार आहे. चंद्रयान 3 ही प्रॉपलशन मॉडेल लेंडर आणि रोव्हर हे चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या कक्षेत घेऊन जाईल आणि चंद्रयान 3 अगदी सहजपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल चंद्रयान 3 मध्ये ऑर्बिट पाठवले जाणार नाही. कारण चंद्रयान 2 च्या ऑर्बिट कडून यासाठी मदत घेतली जाणार आहे.

चंद्रयान ३ मोहीमचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत?

चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरूप उतरणे हे या मोहीमचे मुख्य उद्दीष्ट्ये आहे. या मिशनमध्ये सर्व प्रक्रिया चंद्रयान दोन सारखीच राहणार आहे. चंद्रावर याआधी अमेरिका, चीन व रशिया हे देश गेले असून,मोहीम यशस्वी झाल्यास भारत चौथा देश ठरेल.

चंद्रयान २ आणि चंद्रयान ३ मध्ये काय फरक आहे?

चंद्रयान २ मोहीम पुर्णतः अपयशी ठरली नाही. तर चंद्राभोवती फिरणारा रोव्हर चंद्रयान २ चे वैशिष्ट्ये होते.चंद्रयान 2 ही मोहीम चंद्रयान 1 नंतरची भारताची दुसरी चंद्र मोहीम होती. ती यशस्वी ठरली होती. यानंतर 22 जुलै 2019 रोजी दुसऱ्या चंद्रयानाचे प्रक्षेपण करण्यात आले.

परंतु चंद्रयान 2 मध्ये लॅन्डर आणि रोव्हर क्रॅश झाल्यामुळे भारताच्या दुसरे चंद्रयान अयशस्वी झाले. चंद्रयान 2 विक्रम ब्लेंडर अलगद उतण्याऐवजी चंद्रावर कोसळले त्यामुळे ज्या कारणामुळे चंद्रयान 2 अयशस्वी झाले त्यामध्ये महत्वाचे बदल करून चंद्रयान 3 हे याच्यात लॅन्डर रोव्हर आणि प्रॉपलशन मॉडेल चा वापर करण्यात आलेला आहे.

चंद्राच्या पृष्ठावर अलगदपणे उतरवण्यास मदत होणार आहे असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेला आहे. या मोहिमेत सॉफ्ट लँडिंग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

१. चंद्रयान ३ चा मुख्य उद्देश काय आहे?

उत्तर - लॅन्डरला चंद्रावर सुरक्षितपणे उतरवण्याचा उद्देश आहे.

२. चंद्रयान चंद्राकडे केंव्हा जाणार?

उत्तर - आता ५ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तसंच त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरायला सुरूवात करेल. त्यामुळे २३ ऑगस्ट हा आता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

3. चंद्रयान ३ कुठे उतरणार आहे?

उत्तर - चंद्राच्या दक्षिण ध्रुवा जवळ उतरण्याची शक्यता आहे.

4.एल व्ही एम चा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर - लॉन्च व्हेईकल मार्क ३ असा होतो.

5. चंद्रयान 3 का महत्त्वाचे आहे?

उत्तर - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणे आणि रोहर वापरून त्याचे कलाकृती शोधणे चंद्रयान दोन जे करू शकले नाही ते करणे हा चंद्रयान 3 चा उद्देश आहे.

6. चंद्रयान 3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहेत?

उत्तर - पी विरामुथुवेल हे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com