
पुणे : ‘‘देशासाठी पदक मिळवायची प्रेरणा मला क्रीडापटू खाशाबा जाधव यांना पाहून मिळाली. मी सैन्यात भरती झालो आणि काश्मीरमध्ये स्वतः नियुक्ती मागून घेतली. १९६५ च्या युद्धात नऊ गोळ्या लागल्याने मी दोन वर्षे रुग्णालयात होतो. त्यामुळे मला कायमस्वरूपी अपंगत्व आले,’’ अशा शब्दांत पॅरा ऑलिंपिकमध्ये देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकणाऱ्या मुरलीकांत पेटकर यांनी आपला जीवनप्रवास व्यक्त केला.