पुणे - महापालिकेच्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतंर्गत नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणावर अवलंबून असलेल्या विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, कलवड यासह अन्य भागातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले आहे. हे सुधारित वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.