Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त सासवड-कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतुकीत बदल

सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक ४ डिसेंबरला रात्री ११ वाजल्यापासून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरून वळविण्यात येणार
Changes heavy traffic Saswad-Kapurhol road on occasion of Datta Jayanti pune
Changes heavy traffic Saswad-Kapurhol road on occasion of Datta Jayanti puneSakal

पुणे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दत्तजयंतीनिमित्त मिरवणूक सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यामुळे सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील अवजड वाहतूक ४ डिसेंबरला रात्री ११ वाजल्यापासून ८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पर्यायी रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश दिले आहेत. कापूरहोळ ते सासवड मार्गावरील अवजड वाहने कापूरहोळवरुन बंगळुरू-पुणे महामार्गावरील नवीन बोगद्यातून पुण्याकडे जातील. तसेच, सासवड ते कापूरहोळ मार्गावरील अवजड वाहने सासवड वीरमार्गे सारोळा आणि सासवड-दिवेघाट मार्गे कात्रज चौक अशी जातील.

श्रीक्षेत्र नारायणपूर येथे ५ ते ७ डिसेंबरदरम्यान श्री दत्त सेवेकरी मंडळ यांच्यावतीने दत्त जयंती सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तमिळनाडू, कनार्टक, राजस्थान या राज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. जवळच असलेल्या केतकावळे गावी असणारे बालाजी मंदिर या ठिकाणीही भाविक जात असतात. दोन्ही देवस्थानची ठिकाणे ही सासवड- कापूरहोळ या मार्गावर आहेत. यात्रा कालावधीत वाहतुकीचे नियमन तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक वळविण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com