esakal | पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

पुणे-सोलापूर मार्गाने प्रवास करताय? वाचा महत्त्वाची बातमी

sakal_logo
By
शरयू काकडे

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जलवाहिनी टाकण्यात येत आहे. त्यासाठी सोलापूर रस्त्यावरील पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा टोलनाका ते रेसकोर्स दरम्यान वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गाने जाण्याचे आवाहन वाहतुक पोलिसांनी केले आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा टोलनाका ते रेसकोर्सच्या उत्तरेकडील दरवाज्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे संबंधीत रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी वाहतूक बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन वानवडी वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. वाहतुकीतील हा बदल 20 जुनपर्यंत कायम राहणार आहे.

हेही वाचा: राजगड, तोरणा गडावर पर्यटकांना बंदी

असा आहे पर्यायी मार्ग

रेसकोर्सपासून घड्याळ चौक, आर्मी पब्लिक स्कुलमार्गे इच्छीत स्थळी पोहचावे.

loading image
go to top