राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात करण्यात आले 'हे' बदल

महेश जगताप
रविवार, 12 जुलै 2020

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययनच्या चारही पेपरमध्ये आयोगाने थोड्याफार प्रमाणात बदल केलेला आहे. या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. या बदलाचं वैशिष्ट्य म्हणजे आयोगाने मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत, व्यापक आणि वर्तमान परिस्थितीला सुसंगत केलेला आहे.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमधील सामान्य अध्ययनच्या चारही पेपरमध्ये आयोगाने थोड्याफार प्रमाणात बदल केलेला आहे. या बदलाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे. या बदलाचं वैशिष्ट्य म्हणजे आयोगाने मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम विस्तृत, व्यापक आणि वर्तमान परिस्थितीला सुसंगत केलेला आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये एकूण 6 पेपर असतात, त्यापैकी मराठी व इंग्रजी यामध्ये कुठलाही बदल केलेला नसून जे इतर सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहे. त्यामध्ये आयोगाने बदल करून त्याला थोडा व्यापक केला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, 'लॉकडाउन करा, पण...'

सामान्य अध्ययन पेपर 1 ज्यामध्ये इतिहास व भूगोलाचा समावेश होतो. सर्वाधिक बदल याच पेपरमध्ये झाल्याचे दिसून येते. जुन्या अभ्यासक्रमानुसार समाज सुधारक हा घटक स्पष्टपणे नमूद नव्हता परंतु त्यावर प्रश्न येत होते. मात्र आता नवीन अभ्यासक्रमामध्ये तो घटक ठळकपणे नमूद केलेला आहे. भूगोलामध्ये ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय हा घटक नव्याने समाविष्ट करून आयोगाने वर्तमान परिस्थितीशी सुसंगत अभ्यासक्रम करण्याचा प्रयत्न केला. सामान्य ज्ञान पेपर 2 जो मुख्यतः राज्यव्यवस्था या घटकाशी संबंधित आहे. यामध्ये आयोगाने भारतीय प्रशासनाचा उगम, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल व कल्याण अधिनियम 2007 यासारख्या घटकांचा नव्याने समावेश केला, सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे लोकप्रशासन हा जो घटक आतापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये नव्हता तो नवीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सामान्य ज्ञान पेपर 3 जो मानव संसाधन विकास आणि मानवी हक्क या घटकाशी संबंधित आहे, यामध्ये जास्त बदल केला नसून फक्त व्यावसायिक शिक्षण या घटकांमध्ये कौशल्य विकास या घटकाला अधोरेखित केलेले आहे व सोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2019  समावेश केला. सामान्य ज्ञान पेपर 4 जो अर्थव्यवस्था व विज्ञान व तंत्रज्ञान या घटकाशी संबंधित आहे, हे यामध्ये जास्त बदल नसून फक्त नवीन अभ्यासक्रम हा शिस्तबद्ध पद्धतीने मांडलेला आहे आहे, की ज्यामुळे विद्यार्थ्यांना संदर्भपुस्तके किंवा संकल्पना कुठल्या कराव्या. यासंबंधी योग्य मार्गदर्शन मिळेल.
एकंदरीत राज्य सेवा मुख्य परीक्षेमध्ये हा जो बदल केला. त्यामध्ये आयोगाने अद्ययावत आणि चालू घडामोडींवर विशेष भर दिल्याचे दिसून येते. नवीन अभ्यासक्रमाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे विद्यार्थी व मार्गदर्शक यांना कुठले घटक अभ्यासावे व कुठल्या घटकांचा सखोलपणे अभ्यास करावा ही बाब आयोगाने स्पष्टपणे मांडलेली आहे.

तळेगावातील स्पोर्ट्स फिश प्रजनन प्रकल्प बंद असण्यामागे हे कारण... 

आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जो नवीन अभ्यासक्रम दिलेला आहे विस्तृत, स्पष्ट, अद्यावत आणि सध्याच्या परिस्थितीला सुसंगत आहे. फक्त कमतरता एवढीच की इतिहास या घटकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यवस्थापकीय व स्थापत्य कौशल्य यांचा समावेश करणे अपेक्षित होते. असे मत आर्थिक आणि राजकीय विश्लेषक अभिजित राठोड यांनी व्यक्त केले .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in the syllabus of the main examination of the State Service Commission