हिंजवडीतील वाहतूकीत आज मिरवणुकीमुळे बदल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल केले आहेत. ​

पिंपरी : गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे हिंजवडीतील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 11) दुपारी चारपासून मिरवणूक संपेपर्यंत हा बदल असेल. हिंजवडी परिसरात दहाव्या दिवशी विसर्जन मिरवणूक असते. त्यानुसार बुधवारी मिरवणुकीदरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी वाहतूक विभागाकडून काही बदल केले आहेत. 

बंद असलेले मार्ग 
- मेझा नाईन हॉटेल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारे सर्व मार्ग 
- कस्तुरी चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग 
- इंडियन ऑइल चौकाकडून शिवाजी चौकाकडे येणारा मार्ग 

पर्यायी मार्ग 
- फेज दोन व तीनकडून येणारी वाहने टी-जंक्‍शन चौकात डावीकडे वळून लक्ष्मी चौक विनोदेवस्तीमार्गे इच्छितस्थळी 
- फेज दोन, तीनकडून येणारी व फेज एककडे जाणारी वाहने जॉमेट्रिक सर्कल चौकातून यू टर्न घेऊन बँक ऑफ महाराष्ट्र येथून डावीकडे वळून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी 
- फेज एककडून येणारी वाहने मेझा नाईन चौकातून डावीकडे वळून लक्ष्मी चौक, विनोदे वस्ती या मार्गाने पुढे इच्छितस्थळी 
- इंडियन ऑइल चौकातून माणगाव फेज एककडे जाणारी वाहने इंडियन ऑइल चौकातून उजवीकडे वळून कस्तुरी चौक, विनोदे वस्ती, लक्ष्मी चौक, टी जंक्‍शन येथून डावीकडे वळून जॉमेट्रिक सर्कलमधून यू टर्न घेऊन बॅंक ऑफ महाराष्ट्र येथून फेज एक सर्कलकडे जाऊन इच्छितस्थळी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Changes in transport in Hinjewadi today