Pune News Sakal
पुणे
Pune News : मिलानमध्ये अडकलेल्या पुण्यातील पर्यटकांची सुटका; मंत्री मोहोळ यांच्यामुळे सुखरूप परतले
Pune Citizens : मध्य आशियातील संघर्षामुळे मिलानमध्ये अडकलेल्या १२ पुणेकरांसह २४ भारतीय प्रवाशांना मुरलीधर मोहोळ यांच्या मदतीने सुखरूप भारतात परत आणण्यात आले.
पुणे : मध्य आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने युरोपमध्ये पर्यटनासाठी गेलेले १२ पुणेकर मिलानमध्ये (इटली) अडकून पडले. मिलानहून दिल्लीला येणारे विमान अचानक रद्द झाले. त्यामुळे १२ पुणेकर आणि १२ अन्य राज्यांतील नागरिक, असे २४ जण हवालदिल झाले. भीती, अस्वस्थता आणि अनिश्चिततेमुळे सर्वांवर प्रचंड ताण होता. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदत मागितली. मोहोळ यांच्या आदेशांनंतर संबंधित विमान कंपनीने नागरिकांना सुखरूप पुण्यात आणले.