charas drugs seized
sakal
पुणे - बँकॉकहून आलेल्या एका भारतीय महिला प्रवाशाकडून एक कोटी रुपये किमतीचे चरस (हशीश) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर जप्त करण्यात आले आहे. पुणे कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि महसूल गुप्तवार्ता संचालनालय (डीआरआय) यांच्या पथकाने गुरुवारी (ता. १) रात्री संबंधित महिलेला अटक केली. नामांकित ब्रँडच्या सौंदर्यप्रसाधनांच्या डब्यांमध्ये लपवून ही तस्करी केली जात होती.