पुणे - कल्याणीनगरमधील 'पोर्श' अपघातानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपीसह त्याच्या मित्रांचे रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयात दहा आरोपींविरोधात आरोप निश्चितीची प्रक्रिया शुक्रवारपासून (ता. २७) सुरू झाली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी खटल्याची सखोल माहिती न्यायालयासमोर मांडली.