
पुणे : सह्याद्री रुग्णालय समूहातील बहुतेक समभाग मणिपाल रुग्णालयाकडे हस्तांतरित झाल्याच्या व्यवहाराची माहिती सह्याद्री रुग्णालयाने धर्मादाय कार्यालयाला दिली नाही. त्यावरून पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी सह्याद्री रुग्णालयाची निरीक्षक नेमून चौकशी सुरू केली आहे. सह्याद्री हे धर्मादाय रुग्णालय असल्याने त्यांनी धर्मादाय कार्यालयाला माहिती न देता व्यवहार केल्याच्या माध्यमांमधील बातम्यांवरून धर्मादायने स्वतःहून ही चौकशी सुरू केली आहे.