
पुणे : कोणत्या धर्मादाय रुग्णालयात निर्धन व आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती खाटा (बेड) शिल्लक आहेत याची माहिती धर्मादाय विभागाच्या संकेतस्थळावर दररोज मिळते. मात्र मागील दोन ते तीन दिवसांपासून हे संकेतस्थळ बंद असल्याने पुण्यातील ५८ धर्मादाय रुग्णालयांपैकी कोणत्या रुग्णालयांत किती खाटा उपलब्ध आहेत, याची माहिती मिळत नसल्याने गरजू रुग्णांना सवलतीच्या दरांतील उपचारांपासून वंचित राहावे लागत आहे.