Mahatma Phule Jan Arogya Yojana : धर्मादाय रुग्णालयांचा राज्य सरकारला ठेंगा; महात्मा फुले जनआरोग्य योजनेकडे दुर्लक्ष

Charity Hospitals : पुणे जिल्ह्यातील अनेक धर्मादाय रुग्णालये महात्मा फुले व आयुष्मान भारत योजना राबविण्याच्या शासन आदेशांकडे दुर्लक्ष करत आहेत.
Mahatma Phule Jan Arogya Yojana
Mahatma Phule Jan Arogya Yojana Sakal
Updated on

पुणे : राज्‍य सरकारची महात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना, आयुष्‍मान भारत योजना या धर्मादाय रुग्‍णालयांमध्‍ये लागू करण्‍याचे निर्देश विधी व न्‍याय विभागाने राज्यातील सर्वच धर्मादाय रुग्‍णालयांना दिले आहेत. परंतु, या योजना लागू करण्‍यास पुण्‍यातील धर्मादाय रुग्‍णालये उदासीन आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण भाग मिळून ५८ धर्मादाय रुग्‍णालये आहेत. त्‍यापैकी काही वैद्यकीय महाविद्यालये असलेले रुग्‍णालये योजनेत आहेत. परंतु, जी कॉर्पोरेट व नामांकित रुग्‍णालये आहेत, त्‍यांच्‍याकडून प्रतिसाद मिळत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com