

Chas Kaman Dam
esakal
राजेंद्र लोथे
चास: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यात गेली काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवार ता. 22 रोजी चास कमान धरणाचा पाणीसाठा 95.30 टक्यावर ( 8.17 टीएमसी. ) वर पोहोचल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडण्यात आले असून एकुण पाच दरवाज्याव्दारे 3500 क्युसेक्स वेगाने पाणी भिमा नदि पात्रात सोडण्यात येत आहे.