Crime News : तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून तिचा पाठलाग; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाने कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून तिचा पाठलाग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Crime
Crimesakal

पुणे - बलात्कार तसेच आठ लाखांचे दागिने घेऊन फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तरुणाने कारागृहातून जामीनावर बाहेर पडल्यानंतर तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून तिचा पाठलाग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी लखन महादेव भिसे (वय २५ रा. पिंपळी, ता. बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका २३ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी एका खासगी कंपनीत नोकरी करते. भिसे आणि तरुणीची गेल्या वर्षी विवाहनोंदणी संकेतस्थळावरून ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. लखनने तिला विवाहाचे आमिष दाखविले. तरुणीला जाळ्यात ओढून त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आर्थिक अडचण असल्याचे सांगून त्याने तिच्याकडून आठ लाख तीन हजार रुपयांचे दागिने घेतले होते.

तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. तिचे दागिनेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी भिसेविरुद्ध फसवणूक, बलात्कार, अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती.

या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्याची कारागृहातून सुटका झाली होती. बाहेर पडल्यानंतर त्याने तरुणीचा पाठलाग सुरू केला होता.

जीपीएस काढून तपासणीसाठी पाठवले -

तरुणी कुठे जाते यावर पाळत ठेवण्यासाठी त्याने तिच्या दुचाकीला जीपीएस लावले होते. त्याआधारे तो तिचा पाठलाग करत. हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने तक्रार दिली आहे. ते जीपीएस काढून तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपाली भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वाती भोरड या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com