
आज पहाटेपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक सुरळीत आहे.
लोणावळा : आज पहाटेपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक सुरळीत आहे. नाताळ सणासाठी बाहेर जाणाऱ्या नागरीकांमुळे गेल्या पाच दिवसांपासून मुंबई-पुणे द्रुतगती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होती. त्यामुळे प्रवाशांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागत होता. परंतू आज पहाटेपासून वाहतूक सुरळीत अहे.
दरम्यान, नाताळच्या सुट्ट्या आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांची गर्दी होत आहे. पर्यटकांच्या वाहनांमुळे बोरघाटात वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने दस्तुरी बोरघाट, खंडाळा वाहतूक पोलिसांच्या वतीने द्रुतगतीवर ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू आहे. मात्र सध्या तरी द्रुतगती मार्गावर वाहनांची फारशी वर्दळ नाही.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
याबाबत महामार्ग प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांच्याशी संपर्क झाला नाही. परंतू सध्या दुपारपर्यंत तरी वाहतूक सुरळीत असल्याचे चित्र दिसत आहे. पोलिस प्रशासनाने 31 डिसेंबरच्या पार्शवभूमीवर या ठिकाणी चांगला बंदोबस्त ठेवल्याचे दिसून येत आहे.