esakal | पुणे-सोलापूर महामार्गावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे
sakal

बोलून बातमी शोधा

pune-solapur highway

पुणे-सोलापूर महामार्गावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे

sakal_logo
By
सावता नवले

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या रसायनमिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करता पावसाच्या पाण्यात सोडल्याने सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ रविवारी ( ता. 30 ) पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर व सेवा रस्त्यावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामधून नागरिकांना नाईलाजास्तव प्रवास करावा लागत असून रस्त्याची वाट लागली आहे. आठवड्यापूर्वी या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याच्या तहसीलदारांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे.

हेही वाचा: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे वेध

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीच्या सामायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या परिसरातून कंपन्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाहेर पडते. ते सांडपाणी कोण सोडते याबाबत विचारणा केल्यास कंपन्या व सांडपाणी प्रकिया केंद्राचे व्यवस्थापन करणारी संस्था, व प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी हात वर करतात. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांना नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही असे वाटल्याने त्यांनी ओढयाला जाणारे सांडपाणी बांध घालून सांडपाणी केंद्राच्या बाहेरील बाजूला आडविले आहे. त्यामुळे हे रसायनमिश्रीत सांडपाणी पुणे-सोलापूर महामार्गावर व सेवा रस्त्यावर साचत असून उग्रवास, दुर्गंधी मोठयाप्रमाणात सुटली आहे. त्या सांडपाण्यातून नागरिकांना पायी, दुचाकी व चारचाकी न्याव्या लागत आहे. येजा करणारांना होणाऱ्या त्रासामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. सांडपाणी बांध घालून आडवून नाक दाबल्याने प्रशासन नियंत्रण मंडळ, महसूल, पोलिस व औद्योगिक विकास महामंडळाला जाग आली आहे. त्यामुळे संबंधितांनी गांभीर्य लक्षात घेत 21 मेला तातडीची बैठक घेऊन पंधरा दिवसात उपाययोजना करण्याच्या सूचना तहसीलदार संजय पाटील यांनी दिल्या होत्या.

हेही वाचा: पुणे: नगरसेवकानंतर आता लसीकरण केंद्रांच्या मान्यतेसाठी खासगी कंपन्यांचा दबाव

प्रदुषण नियंत्रण मंडळाने 15 दिवसात सांडपाणी सोडणाऱ्या कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरूध कारवाई करून परिसरात साचलेले रसायनमिश्रीत सांडपाणी पंपाने उचलून प्रक्रियेसाठी घेण्याच्या सुचना दिलेल्या याला आठ दिवस उलटून गेले. तरीही ठोस उपाययोजन झाल्या नाहीत. उलट शनिवारी ( ता. 29 ) झालेल्या पावसात कंपन्यांनी लाखो लिटर पाणी सोडल्याने रविवारी ( ता. 30 ) महामार्ग व सेवा रस्त्यावर रसायनमिश्रीत सांडपाण्याचे तळे साठले आहे. त्यामुळे येजा करणारे प्रवाशी व ग्रामस्थ हैराण झाले आहे.

हेही वाचा: नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे वेध

loading image
go to top