Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

वारीच्या उंबरठ्यावर इंद्रायणी नदीत रसायनयुक्त सांडपाण्याचा मारा; फेसाळलेल्या पाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका
The Indrayani River has turned foamy again ahead of Ashadhi Wari, raising serious health concerns for thousands of Warkaris visiting Alandi.

The Indrayani River has turned foamy again ahead of Ashadhi Wari, raising serious health concerns for thousands of Warkaris visiting Alandi.

Sakal

Updated on

आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे सहा दिवस उरले आहेत. मात्र आज सकाळी पिंपरी-चिंचवड हद्दीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी सायंकाळनंतर रात्रभर साबणाच्या पाण्याप्रमाणे फेसाने तरंगताना दिसत होती. ऐन वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com