Pune Crime News : तरुणांना धमकावून खंडणी उकळली; पोलिस कर्मचाऱ्यासह दोघांविरुद्ध गुन्हा
Police Extortion : बोपदेव घाटात छायाचित्रणासाठी आलेल्या चेन्नईतील तरुणाला मारहाण करून खंडणी घेतल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्यासह मित्रावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : बोपदेव घाटात छायाचित्रकरणासाठी आलेल्या चेन्नईतील तरुणाला मारहाण, तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन २८ हजार रुपयांची खंडणी उकळणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या मित्रावर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला.