
पुणे - ‘छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेऊन त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता. फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतापेक्षा भुजबळ यांचे वेगळे मत होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे, यानुसार त्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केला.