

Dharau nursing infant Chhatrapati Sambhaji Maharaj at Purandar Fort, symbolizing her selfless sacrifice for Maratha Swarajya under Shivaji Maharaj's legacy.
esakal
Dharau descendants : छत्रपती संभाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा जळजळता हुंकार! शंभूराजांचे नाव घेताच आजही प्रत्येक मराठी माणसाच्या अंगात हत्तीचे बळ संचारते आणि अभिमानाने ऊर भरून येतो. १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर या सिंहाच्या छाव्याचा जन्म झाला. मात्र स्वराज्याचा हा वारसदार जन्माला आला तेव्हा एक गंभीर पेच निर्माण झाला होता. शंभूराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंची प्रकृती बाळंतपणानंतर प्रचंड खालावली होती. त्यांना स्वतःच्या तान्ह्या बाळाला दूध पाजणेही शक्य नव्हते. अशा वेळी स्वराज्याच्या या धाकट्या धनींना जीवनदान देण्यासाठी एक माऊली धावून आली, ज्यांचे नाव इतिहासात 'धाराऊ' म्हणून अजरामर झाले आहे.