मंगळवेढेकरांनी जपला छत्रपती चा ऐतिहासिक वारसा
मंगळवेढेकरांनी जपला छत्रपतीचा ऐतिहासिक वारसा
...............
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कर्तुत्वावर महाराष्ट्राचा भगवा पताका मोठ्या दिमाखाने फडकविण्याचे काम केले त्यांचा पदस्पर्श मंगळवेढा शहराला लाभला. मंगळवेढ्याची भूमी पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेल्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन, कृष्ण तलावाची सुशोभीकरण व छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभा केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जतन करण्यासाठी मंगळवेढेकरांनी उभा केलेला पुतळा मंगळवेढकरांना प्रेरणा देणार आहे.
.................
PNE25V81076
हुकुम मुलाणी
.................
मंगळवेढा गावाबाबत सोलापूर गॅजेटेमध्ये आलेल्या माहितीनुसार मंगळवेढा हे नव्या शतकात दहाव्या शतकात आणि अकराव्या शतकात राजकीयदृष्ट्या एक महत्त्वाचे शहर होते, असे दिसून येते. कल्याणीचे राज्यकर्ते कलचुरे यांच्या काळी ते राज्यकर्त्याचे निवासस्थान होते. काही काळ राजधानी होती. पुढे यादव ओंसीय भिल्लम याने १७ जानेवारी ११६२ पासून तालुक्याचे वर्चस्व जुगार मंगळवेढा येथे आपली राजधानी केली. त्याने कल्चरल राजा भिल्लम याचा लढाईत पराभव करून त्याच ठार केले. त्याप्रमाणे मंगळवेढा तालुक्याचे राजवट होऊन देवगिरी यादवाची राजवट सुरू झाली. ही घटना सन ११७० ते ११८४ दरम्यान होऊन राजधानीचे स्थान संपुष्टात आले. मंगल बीर म्हणजे ज्याला मराठीत मंगळवेढा म्हणतात. बहामनी राज्याच्या विघटनाची सुरुवात १४९० मध्ये होऊन सन १५३८ मध्ये ते पूर्णपणे अस्तगत झाले. बहामनी राज्याचे इतर कोणतेही दोष असले तरी भौगोलिकदृष्ट्या एकच सलग व एकछत्री असे राज्य होते. त्या राज्याची पाच शकले होतात ही भौगोलिक सलगता आणि एक सूत्रता नाहीशी झाली. या विघटनानंतर मंगळवेढा भागावर आदिलशाहीचा अंमल सुरू झाला आणि या राजवटीच्या सत्तेखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जिल्हे कोल्हापूर, सांगली, सातारा हे जिल्हे सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील काही प्रदेश येत होता. लग्न समारंभाचे निमित्त होऊन तसेच निजामशाही व आदिलशाही यांचे घनघोर युद्ध होऊन शक १५१४ मध्ये बुरान निजामशाही थेट मंगळवेढ्यापर्यंतचा आदिलशाही मुलुख जाळून उद्ध्वस्त केला तेव्हा मालोजीराजे भोसले यांनी मोठ्या पराक्रम केला. त्याचबरोबर मूर्तीच्या निजामशहाने लग्नास विरोध केल्याने विजापुरी सरदार दिलावर खान औशाच्या किल्ल्यावर चाल करून गेला मालोजीराजांनी मोठ्या सफाईने मूर्तीच्या निजामशाचा बचाव केला. तिथून सुमारे २५० वर्ष भोसले घराण्याचा मंगळवेढा नगराची संपर्क झालेला आहे. मालोजीराजे नंतर शहाजीराजे, छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजी राजे, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती रामराजे आणि सातारा गादीचे शेवटचे छत्रपती शहाजी महाराज यांचा या नगराची संपर्क झालेला आहे. निजामाशिवाय निजामशाही आणि आदिलशाही यांच्या आणि संघर्षांच्या काळात अहमदनगर जवळ भालेवाडी येथे १५४६ मध्ये लढाई झाली. अहमदनगरच्या निजामशाहीचे सैन्य विरुद्ध दिल्लीचे मोगल सैन्य आणि विजापूरच्या आदिलशाहीची शनी एकत्रितपणे अशी तुंबळ युद्ध सुरू झाले. या युद्धात मोगल सैन्य आणि विजापूरचे आदिल सैन्य या सैन्य संयुक्त सैन्याचा पराभव झाला निजामशाही सैन्याला विजय मिळाला. या विजयाचे शिल्पकार म्हणून शहाजीराजे भोसले यांचा मोठा बोल बोला झाला शिवजन्माच्या अगोदर काही दिवस शहाजीराजे हे मंगळवेढा येथे येऊन पुढे मार्गस्थ झाले. इसवी सन १६६५ मध्ये औरंगजेबचा सरदार मिर्झाराजे जयसिंग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्याची एकत्रित मोहीम आदिलशाही राजधानी विजापूर येथे झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे निवडक ७००० पायदळ शंभूराजेच्या वतीने १५०० घोडदळ सरनोबत नेताजी पालकर यांच्यासह पुरंदरच्या तहाप्रमाणे १९ नोव्हेंबर १६६५ पासून सामील झाले पुरंदरच्या तळावरून डिसेंबर महिन्याच्या सात तारखेला ताथवडा फलटण जवळ किल्ला जिंकण्यासाठी रवाना झाले या सैन्याने फलटण अगोदर जिंकले होते. ताथवडा घेऊन महाराजांचे विजय सैन्य पुढे खटाव व मंगळवेढ्यावर चालून गेले एक आठवड्याचा खटाव नंतर १८ डिसेंबर रोजी मंगळवेढा जिंकून घेतले मंगळवेढ्याच्या या मोहिमेची तपशीलवार माहिती या मुन्तरव-बुल-लुबाब या महिंद्राने या ग्रंथकर्त्यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा या किल्ल्याला पदस्पर्श लागला त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा देखील नंतरच्या काळात मंगळवेढा किल्ल्याशी संबंध आला परंतु गेल्या काही वर्षात या किल्ल्याची पडझड झाली. त्यामध्ये किल्ल्यामध्ये अनेक शासकीय कार्यालय कार्यरत होते. शासन कार्यालयाच्या दुरुस्तीसाठी पैसे देत होते. मात्र, किल्ल्याच्या ऐतिहासिक किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत नव्हते. त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा मंगळवेढेकरांना जतन करून ठेवावा, अशी तमाम मंगळवेढेकरांची मागणी लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दैनिक ‘सकाळ’ ने याबाबत बातमीच्या माध्यमातून आवाज उठवला. दरवर्षी २० डिसेंबर हा दिवस मंगळवेढेकराकडून ‘शिवमुक्काम दिवस’ म्हणून साजरा केला जात आहे. त्यानंतर या किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागाकडून जवळपास दीड कोटीचा निधी उपलब्ध झाला. यासाठी आमदार समाधान आवताडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी मंगळवेढा किल्ल्यात येण्यापूर्वी त्यांचे घोडदळ पायदळ मंगळवेढापासून काही अंतरावर जिथे घोड्याच्या पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकेल अशा ठिकाणी कृष्ण तलाव आहे. त्या ठिकाणी वास्तव्य केले. तोही ऐतिहासिक कृष्ण तलावामध्ये पर्यावरण समृद्ध करण्यासाठी राहुल शहा यांच्या पुढाकारातून मोठी वृक्ष लागवड देखील करण्यात आली होती. मात्र, या तलावाला संरक्षित भिंत नसल्यामुळे लगतच्या जनावराकडून या झाडांच्या झाडे उध्वस्त करण्यात आले व जलयुक्त शिवार मोहिमेत या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यानंतर ऐतिहासिक काही मूर्ती अवशेष सापडल्या ते देखील अवशेष मूर्ती या सोलापूर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आल्या वास्तविक पाहता या वस्तू मंगळवेढासाठी एक स्वतंत्र वस्तू संग्रहालय करून ठेवणे अपेक्षित होते. कृष्ण तलावाच्या दुरुस्तीसाठी आमदार समाधान आवताडे यांनी पर्यटन विभागाकडून अडीच कोटीचा निधी उपलब्ध करून किल्ल्याला चार कंपाऊंड व त्या ठिकाणी वृक्ष लागवड व अन्य सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे मंगळवेढेकरांसाठी हा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी झालेले प्रयत्न हे कौतुकास्पद असले तरी अशा या मंगळवेढेकरांना एक छत्रपती शिवरायांचा आश्वारूढ पुतळा असावा, अशी एक मंगळवेढेकरांची भावना होती. ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने मंगळवेढ्यातील काही लोकांनी सह्याची मोहीम राबवली. अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले. परंतु तत्कालीन जिल्हा नियोजन मंडळ सदस्य अजित जगताप यांनी यामध्ये पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ समिती स्थापन करून लोकसहभाग घेतला. या लोकसभागातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले जवळपास ४० लाख रुपयांचा लोकसहभाग राहिला. त्यामध्ये सर्वाधिक सहभाग प्रा. शिवाजीराव काळुंगे यांच्या धनश्री परिवाराने दिला. येथील मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्याने देखील यामध्ये आपले योगदान दिले. त्याचबरोबर पुणे येथील मूर्तिकराकडून जवळपास साडेचार टन वजनाच्या अश्वारूढ पुतळा शिवप्रेमी चौकात नुकताच उभा करण्यात आला आहे. हा पुतळा मंगळवेढाकरांसाठी आदर्श ठरू लागला. अशा पद्धतीने मंगळवेढेकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी दररोज सकाळी शिवाजी महाराजांवरील गीत सादर करून मंगळवेढेकरांना प्रेरणा दिली जाते. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेल्या भुईकोट किल्ल्याचे संवर्धन, कृष्ण तलावाची सुशोभीकरण व शिवम दरवर्षी साजरा करण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा उभा करून जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा ऐतिहासिक वारसा टिकवण्यासाठी येथील सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे पदाधिकारी मोठे कष्ट घेत आहेत या मंडळाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे त्या माध्यमातून ते देखील वर्ष विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून हा ऐतिहासिक वारसा पुढच्या पिढीसाठी कसा प्रेरणादायी राहील यासाठी प्रयत्न करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

