जुनी सांगवीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान घालतेय भुरळ..परिसर प्रकाशाने उजळला

The Chhatrapati Shivaji Maharaj Park in Old Sangvi was illuminated with Street lights
The Chhatrapati Shivaji Maharaj Park in Old Sangvi was illuminated with Street lights
Updated on

जुनी सांगवी : कोरोना संकटामुळे लॉकडाऊन काळात उद्याने बंद होती. कोरोना संसर्गाला   रोखण्यासाठी गर्दीला अटकाव रहावा म्हणून काही नियम व अटींवर उद्याने अनलॉक काळात पुन्हा सुरु करण्यात आली आहेत. यात जुनी सांगवी येथील मुळा नदी किनारा परिसर मधुबन सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील सर्वात मोठे उद्यान असुन येथे मुळा नदी किनारा परिसर असल्याने मोकाट जनावरे, भटकी कुत्री, श्वापदांचा वावर होता. उद्यानाच्या सौंदर्यासह या गोष्टी लक्षात घेऊन उद्यानाच्या आतील व परिसरातील विद्युत दिवे गेली अनेक दिवसांपासून बंद होते. यामुळे वारंवार येथील मधुबन मित्रमंडळाच्यावतीने येथील दुरुस्त्या करण्याबाबत उद्यान विभागाकडे मागणी करण्यात आली होती.

याची दखल घेत स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरीकांच्या पाठपुराव्यामुळे येथे पालिका विद्यूत विभागाकडून येथे दिव्यांची दुरुस्ती करण्यात आल्याने उद्यान परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे.दिव्यांच्या प्रकाशामुळे उद्यानाचे रुपडे बदलून सौंदर्यात भर पडली आहे.

हुल्लडबाज  तळीरामांनाही लागणार लगाम
नदी किनारा परिसर व अंधाराचा फायदा घेत येथे उद्यानाच्या बाहेरील परिसरात हुल्लडबाज मंडळी वाढदिवस साजरा करत गोंगाट करणे,पार्ट्या करणे असे प्रकारही येथे घडत होते.तर तळीरामही अंधाराचा फायदा घेत परिसरात मद्यपान करायचे याबाबत ही येथील नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या.परिसरातील दिले सुरू झाल्याने या गोष्टींनाही लगाम लागणार आहे.

येथील दिव्यांची दुरूस्ती करावी.सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी गेली अनेक दिवसांपासून मागणी करण्यात आली होती.लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करुन येथील कामे केल्याने परिसर उजळला आहे. गणेश निवृत्ती ढोरे अध्यक्ष मधुबन मित्रमंडळ-


कोरोनामुळे लॉकडाऊन काळात गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मधुबन सोसायटी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील प्रकाश व्यवस्था बंद होती. विद्युत विभागा मार्फत तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन बंद असलेल्या सर्व दिव्यांची दुरुस्ती करून येथील अंतर्गत शेड व परिसरात नविन एलईडी फिटिंग बसवून प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.

''एकुण १४ दिवे दुरुस्ती करण्यात आले तर ११ दिवे नविन बसविण्यात आले आहेत. याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे निविदा काढण्यात आलेल्या आहेत. लवकरच कॅमेरे ही बसविण्यात येणार आहेत.''
- शामसुंदर बनसोडे,विद्युत अभियंता उद्यान विभाग
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com