खडकवासला : छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) राष्ट्रीय जीवनात छत्रपती शिवाजी महाराज एक अवतारी पुरुष होते. मोगल साम्राज्याचा शेवट करत हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी युक्ती, बुद्धी आणि शक्तीचा त्रिवेणी संगम घालून राज्य केले. देशात एक प्रकारची नवचेतना निर्माण केली. जगभरातल्या इतिहासकारांनी त्यांच्या सामर्थ्याचं गुणगान केलं आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज देशाचे नव्हे तर संपूर्ण जगाचे 'हिरो' आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (governer bhagtsinh koshyari) यांनी सिंहगड येथे काढले.
राज्यपालांनी सिंहगडास आज भेट दिली. नरवीर तानाजी मालुसरे, छत्रपती राजाराम महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावेळी आमदार भीमराव तापकीर, आमदार मुक्ता टिळक, राज्यपालाचे विशेष सचिव राकेश नैथानी, घेरा सिंहगडच्या सरपंच मोनिका पढेर, सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते, पुरातत्व खात्याचे सहायक संचालक विलास वाहने, उपवनसंरक्षक राहुल पाटील, उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विवेक पाटील, गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, महावितरणचे मुळशीचे उपअभियंता फुलचंद फड, गोऱ्हे बुद्रुकचे सदस्य सुशांत खिरीड, भाजपचे अध्यक्ष सचिन मोरे, घेरा सिंहगडच्या तलाठी वर्षा आरमाळकर यांच्यासह सर्व संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थितीत होते. file photo
राज्यपाल कोश्यारी यांना किल्ले सिंहगड व परिसराची माहिती सिंहगडचे अभ्यासक डॉ. नंदकिशोर मते यांनी दिली. लोकमान्य टिळक यांच्या बंगल्यास राज्यपालांनी भेट दिली. तेथिल त्यांचे वास्तव्य आणि परिसराची माहिती आमदार मुक्ता टिळक यांनी दिली. file photo
छत्रपती शिवाजी महाराज देशाचा स्वाभिमान व अभिमान आहे. त्यांच्या सारख्या इतर थोर राष्ट्र पुरुषांबद्दल लहान मुलांना सुरुवातीपासून शिक्षण दिले पाहिजे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास तसेच त्यांच्या त्याग व बलिदानाबद्दल बालकांना शिक्षण दिल्यास आपल्या देशात नरवीर तानाजी मालुसरे व छत्रपती शिवाजी महाराज घडतील, असा विश्वास राज्यपाल कोश्यारी यांनी व्यक्त केला.file photo
सिंहगडावर स्थानिक रहिवाशी महिलांनी काढल्या होत्या. घेरा सिंहगडच्या माजी सदस्य सीमा पढेर यांनी त्यांच्या घरासमोर तिथे राज्यपाल जानाऱ्या रस्त्यावर रांगोळीने wel come असे लिहिले. त्यांनी राज्यपालांना औक्षण केले. त्यानंतर राज्यपाल त्याना म्हणाले कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंड मध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे.... असे म्हणत पुढे मार्गस्थ झाले.file photo