कोरोनाचा कहर अन् त्यातही आळंदीत ग्रामिण रूग्णालयात पार्किंगमध्ये चिकन पार्टी

लसीकरणाचे नियोजन नाही पार्टीचे नियोजन कसे..?
coronavirus
coronavirusSakal Media

आळंदी ः कोविशिल्ड लसीकरणासाठी आधीच नियोजनाचा अभाव आहे. मात्र ग्रामिण रूग्णालयाच्या (alandi rural hospital) कर्मचा-यांच्या निवासी सदनिकेच्या पार्किंगमधे काल सायंकाळी चिकन (chicken party) आणि मासवाडीच्या पार्टीचे शाही आयोजन झाल्याने शहरात मात्र चर्चा रंगली.(chicken party in the parking lot of alandi rural hospital).

coronavirus
पुणे महापालिकेने उभारला ऑक्सिजन प्लांट

सात किलो चिकन आणि मासवडीचा फडशा यावेळी कर्मचा-यांना पाडला. पार्टीचे नियोजन कुणी केले हे मात्र कळाले नाही. काल सायंकाळी ग्रामिण रूग्णालयाचे डॉक्टर, कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे नातेवाईकही यामध्ये सामिल असल्याची चर्चा होती. कोविड काळात कर्मचारी शिणले म्हणून पौष्टीक आहार होता असेही समर्थन काहींनी केले. खरेतर गेली महिन्याभरात ग्रामिण रूग्णालयामार्फत केले जाणा-या लसिकरणात वशिलेबाजीने ज्येष्ठ नागरिक त्रस्त होते. तर रेमडेसिवीर इंजेक्शनही राजकिय व्यक्तींना वाटप केल्याची अजून चर्चेचे चर्वण केले जात आहे. त्यात कर्मचा-यांची अरेरावी सहन करावी लागली. मात्र कालच्या चिकन पार्टीच्या चर्चेने ग्रामिण रूग्णालयात कोरोना काळातही पार्टी झोडल्याने आश्चर्च व्यक्त करण्यात येत आहे.

coronavirus
पुणे महापालिका उभारणार लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल

बाहेर पार्टी झाली की पोलिस कारवाई करतात. इथे मात्र जवळच पोलिस ठाणे असूनही कानाडोळा होता. ग्रामिण रूग्णालयाच्या मार्फत रेमडेसिव्हर इंजेक्शन कुणाकुणाला वाटप केले याची माहिती एका कार्यकर्त्याने विचारली असता त्याच्यावर दबाव टाकून अर्ज माघारी घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. मात्र इंजेक्शन वाटपाची माहिती व यादी अद्याप दिली जात नसल्याचे चित्र आहे. याबाबत ग्रामिण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणपत जाधव म्हणाले.आरोग्य कर्मचारी काम करतात म्हणून एका सामाजिक कार्यकर्त्याने जेवण दिले.गैरसमज नको. मर्यादित कर्मचारी होता. त्याठिकाणी गर्दी बिलकूल नव्हती.

coronavirus
पिंपरी शहरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या संतप्त भावना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com