चिकनचे दर निम्म्याने खाली आल्याने मांसाहारी खवय्यांची चंगळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Broiler Chicken

श्रावण महिन्यात हिंदू कुटुंबात मांसाहार केला जात नसल्याने आषाढ महिन्यात मांसाहारी खवय्ये मोठ्या प्रमाणावर आखाड पार्टीचे आयोजन करतात.

चिकनचे दर निम्म्याने खाली आल्याने मांसाहारी खवय्यांची चंगळ

पारगाव - गटारी आमवस्या गुरुवार (दि. २८) दोन दिवसावर आली असून आषाढ महिना संपायला अवघे दोनच तीनच दिवस शिल्लक असतानाही बॉयलर कोंबडीची आवक वाढल्याने जिवंत कोंबडीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने जिवंत कोंबडीचे प्रती किलोचे उच्चांकी १३५ रुपयांपर्यंत गेलेले दर आता प्रती किलो ५० ते ५५ रुपयांपर्यंत खाली आल्याने महिनाभरापूर्वी २४० रुपये किलो दराने मिळणारे चिकन आता प्रती किलो १२० ते १४० रुपये दराने मिळू लागल्याने मांसाहारी खवय्यांची चंगळ झाली आहे. गटारीला होणाऱ्या आखाडपार्टी आयोजनाबाबत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे.

श्रावण महिन्यात हिंदू कुटुंबात मांसाहार केला जात नसल्याने आषाढ महिन्यात मांसाहारी खवय्ये मोठ्या प्रमाणावर आखाड पार्टीचे आयोजन करतात. त्यामुळे आषाढ महिन्यात चिकन, मटन यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे चिकन मटन चे बाजारभावहि वाढलेले असतात, आषाढ महिन्यातील शेवटचा दिवस गटारी आमवस्या या दिवशी तर चिकन मटन चे दर उच्चांकी पातळीवर जातात. एक महिन्यापूर्वी जिवंत कोंबडीचे प्रती किलोचे दर १३५ रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे चिकनचे दर २४० ते २६० रुपयांवर गेले होते.

आषाढात हेच दर आणखीन वाढतील अशी शक्यता होती. परंतु, मागील १० ते १२ दिवसापासून सुरु असलेला पाऊस त्यामुळे बाजारपेठा थंडावल्या आहेत. पावसामुळे ग्राहक बाहेर पडत नसल्याने बाजारातहि मंदीचे सावट पसरले आहे. त्याचा परिणाम चिकन विक्रीवर झाला असून, मागणी घटली आणि जिवंत कोंबड्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे खरेदी दर प्रती किलो ५० ते ५५ रुपयांपर्यंत खाली आले. त्यामुळे चिकनचे दर हि प्रती किलो किलो १२० ते १४० रुपये झाले. असल्याची माहिती आंबेगाव तालुक्यातील चिकन विक्रेते बाबू मनियार, इसाक शेख आणि कोंबडी चे होलसेल व्यापारी जावेद मिस्त्री यांनी दिली.

प्रतीक्रिया

मागील वर्षापासून कोंबडीच्या खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे मका व सोयाबीन मध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाल्याने जिवंत कोंबडीचा प्रती किलो वजनासाठी येणारा उत्पादन खर्च ९५ ते १०० रुपयांवर गेला होता. जिवंत कोंबडीला चांगला बाजारभाव मिळत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना चांगले दिवस आले होते. परंतु, आवक वाढल्याने बाजारभाव प्रती किलो ५० ते ५५ रुपयांपर्यंत खाली आल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सोसावा लागणार आहे.

- प्रमोद हिंगे, अध्यक्ष ऊर्जा फुड्स अँन्ड ऍग्रो प्रा.लि.

Web Title: Chicken Rate Decrease

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ChickenDecrease
go to top