पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

cm.jpg
cm.jpg

पिंपरी, (पुणे) : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (ता.9)  झाले. चिंचवड मधील प्रेमलोक पार्क येथे आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून तसेच कोनशिलेचे अनावरण करून उद्‌घाटन केले.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चाबुकस्वार, महेश लांडगे, सुरेश गोरे, मेधा कुलकर्णी, संजय भेगडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलिस आयुक्त मकरंद रानडे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी औपचारिक उद्‌घाटन झाल्यानंतर आयुक्तालयाची पाहणी केली.

बऱ्याच वर्षापासून प्रतीक्षेत असलेले पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्‍तालय 15 ऑगस्ट 2018 रोजी कार्यान्वित झाले. आर. के. पद्‌मनाभन यांना पहिले पोलिस आयुक्‍त होण्याचा बहुमान प्राप्त झाला. मात्र पोलिस आयुक्‍तालयाकरिता स्वतंत्र इमारत नसल्याने ऑटो क्‍लस्टर येथील इमारतीमधून पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार सुरू झाला. पोलिस आयुक्‍तालयाकरिता प्रेमलोक पार्क येथील शाळा, पोलिस मुख्यालयाकरिता निगडी येथील महापालिकेची शाळा, तसेच पोलिसांच्या इतर कार्यालयांकरिता चिंचवडगाव येथील बस स्थानकाजवळ असलेल्या व्यापारी संकुलाच्या देण्याचा ठराव महापालिकेने मंजूर केला. 

जून महिन्यात येथील शाळा दळवीनगर येथे स्थलांतरित करण्यात आली. त्यानंतर पोलिस आयुक्‍तालय सुशोभिकरणाच्या कामाला सुरवात झाली. १ जानेवारीपासून पोलिस आयुक्तालयात कामकाजास सुरूवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com