मुख्यमंत्र्यांची यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास : सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा म्हणजे सर्वासामान्य माणसाला त्रासच आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

बारामती शहर : मुख्यमंत्र्यांची जनादेश यात्रा म्हणजे सर्वासामान्य माणसाला त्रासच आहे, परभणी व हिंगोलीमध्येही मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे वीजेचे कनेक्शनच कापून टाकण्यात आले होते, ही यात्रा म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक व झाडांच्या फांद्या तोडणे हे समीकरण बनले असून हे दुर्देवी आहे, त्यांच्या या यात्रेदरम्यान ज्या बाबी घडल्या त्याचा मी निषेध करते अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आज बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या, कार्यकर्त्यांना घोषणा देण्याचा अधिकार आहे, बारामतीत जर कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असतील तर  दडपशाहीने जर पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठी हल्ला केला असेल तर मी पोलिसांच्या या कृतीचा निषेध करते. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की ही दडपशाही कोठेतरी थांबायला हवी आणि मुख्यमंत्र्यांचाच जो लाडका शब्द आहे पारदर्शक तशी चौकशी व्हायला हवी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's journey is a distress to the common people says Supriya Sule