बारामतीकर डॉ. धनंजय घनवट यांना मुख्यमंत्री विशेष सेवा पदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanajay Ghanwat

बारामतीकर डॉ. धनंजय घनवट यांना मुख्यमंत्री विशेष सेवा पदक

बारामती : मूळचे बारामतीकर असलेले व सध्या आसामची राजधानी गुवाहाटी येथे कार्यरत असलेले पोलिस अधीक्षक डॉ. धनंजय घनवट यांना त्यांच्या दैदीप्यमान कामगिरीबद्दल मुख्यमंत्री विशेष सेवा पदक जाहिर झाले आहे.

आसामचे मुख्यमंत्री डॉ. हेमंत विश्व शर्मा यांनी डॉ. घनवट यांना या विशेष सेवा पदकाची घोषणा केली होती. आसाम पोलिस दिनाच्या दिवशी येत्या 1 ऑक्टोबर रोजी होणा-या एका शानदार कार्यक्रमात त्यांना हे पदक प्रदान केले जाणार आहे.

मूळचे बारामतीकर असलेले डॉ. धनंजय घनवट यांनी आसाममधील बंडखोरीविरुध्दच्या कारवाया, नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करणे, आसाम पोलिस सायबर डोम ही अभिनव संकल्पना राबविणे, कोविडच्या काळात रुग्णांची काळजी घेणा-या 500 स्वयंसेवकांचे सोशल कॉल सेंटर उभारण्यासाठी कोविड सेंटीनेल नावाचा प्रकल्प कार्यान्वित करणे, महत्वाचे फौजदारी खटले निकाली काढणे, गेंड्याची शिकार रोखण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करणे, विज्ञान व तंत्रज्ञान धोरणात एमईसीचा पाठपुरावा करण्याच्या प्रयत्नाबद्दल प्रतिष्ठित चेव्हनिंग आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त करणे या सारख्या विविध कामांची दखल घेत आसामच्या मुख्यमंत्र्यांनी डॉ. धनंजय घनवट यांना मुख्यमंत्री विशेष सेवा पदक जाहीर केले.

Web Title: Chief Ministers Special Service Medal To Drdhananjay Ghanwat

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :BaramatipoliceAasam