चिखलठाण गट जिल्हा परिषद निवडणूक वार्तापत्र
लोगो : चिखलठाण जि.प. गट
---
ता.वि. आघाडी विरुद्ध भाजप-राष्ट्रवादी युती
तुल्यबळ दुरंगी लढत; प्रतिष्ठेची लढाई; क्रॉस व्होटिंगचा धोका
गजेंद्र पोळ : सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. ३ : आमदार नारायण पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या चिखलठाण जिल्हा परिषद गटात करमाळा तालुका विकास आघाडीचे प्रमोद बदे आणि भाजप- राष्ट्रवादी युतीचे प्रशांत पाटील यांच्यात अटीतटीचा सामना रंगला आहे. बागल- शिंदे- जगताप गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने ही लढत तुल्यबळ बनली असून, अंतिम टप्प्यात राजकीय रंगत वाढली आहे.
या गटात एकूण ३२ हजार २८७ मतदार असून, मागील विधानसभा निवडणुकीत बहुतेक गावांत आमदार नारायण पाटील यांना मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे तालुका विकास आघाडीला हा गट सोपा मानला जात होता. मात्र, बागल- शिंदे- जगताप गटाचे कार्यकर्ते प्रशांत पाटील यांच्या पाठीशी उभे राहिल्याने चित्र बदलले असून, निवडणूक तुल्यबळ झाली आहे.
उमरड, कुगाव, केडगाव, पोफळज, कोंढेज व रिटेवाडी या गावांत तालुका विकास आघाडीला मताधिक्य मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर झरे, चिखलठाण, वाशिंबे, वरकटणे आणि मांजरगाव या भागांत भाजप- राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराला आघाडी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दोन्ही बाजूंनी करमाळा तालुक्यात पूर्वीपासून राजकारणात सक्रिय असलेल्या परिवारांतील उमेदवार रिंगणात असल्याने शेवटच्या टप्प्यात राजकीय डावपेचांना वेग येणार आहे. काही भागांत क्रॉस व्होटिंगचा धोका असल्याने कोणालाही सहज विजय मिळवणे कठीण ठरणार आहे. त्यामुळे चिखलठाण गटाच्या निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
---
चौकट
चिखलठाण व उमरड गणांमध्येही चुरस
- चिखलठाण गण (सर्वसाधारण महिला) : तालुका विकास आघाडीकडून लता केरू गव्हाणे तर राष्ट्रवादी- भाजप युतीकडून वनमाला चंद्रकांत सरडे यांच्यात थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लावून प्रचार सुरू आहे.
- उमरड गण : तालुका विकास आघाडीच्या आदिती अतुल पाटील विरुद्ध भाजप- राष्ट्रवादी युतीच्या सोनाली शरद देवकर अशी अटीतटीची लढत आहे. पंचायत समिती सभापतिपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव असल्याने या गणातील विजयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

