esakal | मंचर उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी बालविकास प्रकल्प 

बोलून बातमी शोधा

मंचर उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी बालविकास प्रकल्प }

कुपोषित बालकांना सकस आहार व योग्य उपचार होण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात बालविकास प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी बालविकास प्रकल्प 
sakal_logo
By
डी. के. वळसे पाटील

मंचर : आंबेगाव तालुक्यात असलेल्या कुपोषित बालकांना सकस आहार व योग्य उपचार होण्यासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात बालविकास प्रकल्प सुरू करण्याचा व सद्य स्थितीत कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जनजागृती करण्याचा निर्णय उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंचर (ता. आंबेगाव) येथील उपजिल्हा रुग्णालय रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सहाय्यक अध्यक्ष उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर, डॉ. नितीन बिलोलीकर, डॉ. प्रीतम बारभुवन, डॉ. विक्रम काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. परेश पोटे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, राम टेमके, डॉ. कैलास भागवत, गणेश औटी,आमिन पठाण उपस्थित होते. 

कोरोना कालावधीत व अन्य वेळीही रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याचे काम केल्याबद्दल  मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अंबादास देवमाने यांचा सन्मान डॉ.नांदापूरकर यांच्या हस्ते झाला.

डॉ. नांदापूरकर म्हणाले, ''कोरोनाच्या महाभयंकर संकटात उपजिल्हा रूग्णालयाप्रमाणेच खासगी डॉक्टर, जिल्हा परिषद कर्मचारी, आशा वर्कर व महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांनी अहोरात्र काम केले आहे. यापुढेही कोरोना रुग्ण वाढू नये म्हणून जेथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या गावातील सर्वेषणाबरोबर मास्क, सोशल डीस्टन्स व सँनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती करावी."

कोडलकर म्हणाले, ''कोरोना तपासणीचे प्रमाण वाढवून लवकर निदान व उपचार करावे. लग्न समारंभ व दशक्रिया विधीत होणारी गर्दी टाळावी.'' 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ आदी रिक्त पदे भरवित, प्रलंबित देयके अदा करावी. अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, डॉ. वर्षाराणी गाडे, डी. के. वळसे पाटील यांनी केली. प्रास्ताविक डॉ. गणेश पवार यांनी केले. डॉ. संजय भवारी यांनी आभार मानले. 

(संपादन : सागर डी. शेलार)