पुणे : उघड्यावर पडलेल्या विजवाहिनीचा संपर्क झाल्याने ४ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

कोंढव्यात प्रशासनाच्या हलगगर्जी आणि निष्काळजीपणांमुळे एका चार वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Shehjad Sayyad
Shehjad SayyadSakal
Summary

कोंढव्यात प्रशासनाच्या हलगगर्जी आणि निष्काळजीपणांमुळे एका चार वर्षाच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोंढवा - कोंढव्यात प्रशासनाच्या हलगगर्जी आणि निष्काळजीपणांमुळे एका चार वर्षाच्या चिमुकल्याला (Child) जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रभाग क्रमांक २७मधील गल्ली क्रमांक १०मध्ये कुबा मस्जिदीजवळ सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उघड्यावर पडलेल्या वीज वहिनीच्या (Electric Line) तारेचा संपर्क (Current) झाल्याने लागलेल्या शॉकमध्ये शेहजाद अमीर सय्यद (वय-४) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू (Death) झाला.

या घटनेनंतर मात्र कोंढवा परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. अशावेळी प्रशासन मात्र, एकमेकांवर ढकलाढकल करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नागरिकांचे स्पष्ट म्हणणे आहे. केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा हा बळी असून साधा काम चालू असल्याचा फलकही याठिकाणी लावण्यात आला नव्हता असे स्थानिक नागरिक सांगतात.

Shehjad Sayyad
Pune Metro Job: इंजिनिअर्ससाठी मेगा भरती, २१ मार्चपर्यंत करा अर्ज

याबाबत कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०४अ अंतर्गत खोदकाम करणारे आणि महावितरणविरोधात कलम ३०४अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. निष्काळजीपणांमुळे आणि अविचारातून ही घटना घडली असल्याचे गुन्हा नोंद करताना म्हटल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सरदार पाटील यांनी सांगितले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरिक्षक (गुन्हे) जगन्नाथ जानकर हे करत आहेत.

सदर खोदकामांविषयी ठेकेदार किंवा महापालिकेकडून कोणतेही पत्र मिळाले नव्हते. महावितरणच्या परवानगीशिवाय हा रस्ता खोदण्यात आला. त्यातच रस्ता अरुंद असल्याने जेसीबीचे काम चालू असताना ये-जा करणे कठीण होते. त्यात जेसीबी काम करत असताना वायर तुटल्याने आणि जागा ओलसर असल्याने विजेचा संपर्क झाला. यात मुलाचा मृत्यू झाला असल्याची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता सुनिल पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com