

PNE26W54991
अहिल्यानगर ः आनंदऋषीजी हॉस्पिटल येथे बालरोग व थॅलसेमिया तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना वसंतलाल चोपडा, सुभाष मुनोत, अलका मुनोत, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी आदी
आनंदऋषीजी हॉस्पिटलचे निरोगी समाजाचे मिशन
वसंतलाल चोपडा ः ९१ बालकांची मोफत आरोग्य तपासणी
अहिल्यानगर, ता. ४ ः निरोगी व सुदृढ समाजाचे मिशन घेऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये सातत्याने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जात आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्यासाठी विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार देण्याचे काम सुरू आहे. बालकांचे विविध आजार व आरोग्य तपासण्या एका छताखाली उपलब्ध करून देत नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात येत असल्याचे वसंतलाल चोपडा यांनी सांगितले.
जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरतर्फे स्व. विलास वसंतलाल चोपडा यांच्या स्मरणार्थ बालरोग व थॅलसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी चोपडा बोलत होते. यावेळी सुभाष मुनोत, अलका मुनोत, संतोष बोथरा, प्रकाश छल्लाणी, सतीश लोढा, डॉ. वसंत कटारिया, माणकचंद कटारिया, बालरोगतज्ज्ञ डॉ. निखिल गुट्टे, डॉ. वैभवी वंजारे, डॉ. दीपी अग्रवाल, डॉ. लिझा बलसारा, डॉ. रूपेश सिकची आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष बोथरा यांनी केले. दर महिन्याला थॅलसेमियाग्रस्त २१० बालकांना मोफत उपचार दिले जात असून, बालकांच्या विविध आजारांवरील उपचार सुविधा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली. शिबिरामध्ये ९१ बालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ बालरोग डॉक्टरांनी बालकांची तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश छल्लाणी यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.