Pune Crime: भीक मागण्यासाठी दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; पुण्यातील पाच जणांना अटक, तीन जण सराईत गुन्हेगार
Pune News:पुण्यात दोन वर्षांच्या चिमुकलीचे भीक मागण्यासाठी अपहरण करणाऱ्या टोळीला अटक. पोलिसांनी तिघांना तुळजापूरहून व दोन जणांना खडकीहून ताब्यात घेतलं.
पुणे : भीक मागण्यासाठी दोनवर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.