अखेर पिंपरीतून अपहरण झालेल्या त्या बालकाचा मृतदेह सापडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर पिंपरीतून अपहरण झालेल्या त्या बालकाचा मृतदेह सापडला

अखेर पिंपरीतून अपहरण झालेल्या त्या बालकाचा मृतदेह सापडला

पिंपरी : पिंपरीतील मासुळकर कॉलनीतून अपहरण झालेल्या सात वर्षीय बालकाचा मृतदेह सापडला. ग्रीनफिल्ड सोसायटी येथे राहणारा सात वर्षीय मुलगा गुरुवारी (ता. ८) सायंकाळी सहाच्या सुमारास खेळायला जातो असे सांगून घरातून गेला. दरम्यान, सव्वा सातच्या सुमारास सोसायटीत राहणारी एक मुलगी मुलाच्या घरी गेली. ' तुमचा मुलगा सापडत नाही' असे सांगितले. त्यांनंतर मुलाचे आई वडील त्याला शोधण्यासाठी गेले. मात्र, तो सापडला नाही.

याप्रकरणी पिंपरी पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला होता. विविध ठिकाणी पथकेही रवाना केली होती. दरम्यान, शुक्रवारी रात्री उशिरा अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह सापडला. अपहरण कोणी व कोणत्या कारणासाठी केले. याचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Child Kidnapped From Pimpri Body Recovered Pune Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pimpri