जोडवे गिळलेल्या बाळाला डॉक्टरांनी दिले जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Saurabh Nimbalkar

आईच्या पायातील जोडवे गिळलेल्या आठ महिन्यांच्या बाळाला बारामतीतील डॉ. सौरभ निंबाळकर यांनी जीवदान दिले.

जोडवे गिळलेल्या बाळाला डॉक्टरांनी दिले जीवदान

बारामती - आईच्या पायातील जोडवे गिळलेल्या आठ महिन्यांच्या बाळाला बारामतीतील डॉ. सौरभ निंबाळकर यांनी जीवदान दिले.

येथील एक आठ महिन्यांचे बाळ खेळत असताना त्याने आईच्या पायातील जोडवे गिळले. काही काळ त्याने हे जोडवे गिळल्याचे कोणाच्या लक्षात आले नव्हते, मात्र त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला, बाळाचे दूध पिणेही अचानकच बंद झाल्यानंतर पालकांनी बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे धाव घेतली.

या बाळाचा एक्स रे काढल्यानंतर त्याच्या घशात हे जोडवे असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने निंबाळकर हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवले. डॉ. सौरभ निंबाळकर यांनी दुर्बिणीद्वारे या बाळाच्या घशात अडकलेले जोडवे बाहेर काढायचा निर्णय घेतला. डॉ. शशांक शहा यांनी त्या बाळाला भूल दिली व त्यानंतर काही क्षणातच डॉ. निंबाळकर यांनी घशात अडकलेले जोडवे अलगद बाहेर काढले आणि सर्वांच्याच जिवात जीव आला. या बाळाची प्रकृती आता स्थिर आहे.

Web Title: Child Life Saving By Doctor Humanity

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..