अन्यायाविरुद्ध आवाज उठवा ,गप्प बसू नका: न्या. खोमणे

अन्यायाविरुद्ध आवाज उठवा ,गप्प बसू नका: न्या. खोमणे
Published on: 

TVS26A00235
तावशी (ता. पंढरपूर) : येथील साधना विद्यालयात आयोजित कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना न्यायिक अधिकारी, अधिवक्ते व मान्यवर.
---
अन्यायाविरुद्ध आवाज उठवा,
गप्प बसू नका : न्या. खोमणे
साधना विद्यालयात सुरक्षित बचपन अभियान
सकाळ वृत्तसेवा
तावशी, ता. ३१ : बालकांवरील अन्याय, अत्याचार किंवा गैरवर्तन सहन करू नका. त्याविरोधात निर्भयपणे आवाज उठवा. अशा प्रसंगी पालक व शिक्षकांना विश्वासात घेऊन गरज पडल्यास कायद्याची मदत घ्या, असे आवाहन न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग के. जे. खोमणे यांनी केले.
तावशी येथील साधना विद्यालयात तालुका विधी सेवा समिती, पंढरपूर आणि पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुरक्षित बचपन’ अभियानांतर्गत पोक्सो कायदा २०१२ विषयावर जनजागृती कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क, संरक्षण, लैंगिक अत्याचारापासून बचाव आणि कायदेशीर मदत याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
न्या. खोमणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत पोक्सो कायद्यातील तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. कोणताही अनुचित प्रसंग घडल्यास न घाबरता तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ॲड. उदय बागल यांनी प्रास्ताविक केले. अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. धनाजी चव्हाण यांनी कायदेशीर तरतुदींची माहिती दिली. यावेळी ॲड. दत्तात्रय यादव, ॲड. लक्ष्मी वाकडे, विद्यालयाचे सचिव बाळासाहेब यादव, अजित यादव, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.