मंचर - खेळता-खेळता आई-वडिलांपासून दूर गेलेली व घाबरल्याने रडत असलेली दोन लहान मुले एकलहरे (ता. आंबेगाव) ग्रामपंचायत हद्दीत जीवन मंगल कार्यालयाजवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. समय सूचकता दाखवून जुन्नर तालुक्यातील एका दाम्पत्याने त्यांना मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी सर्वत्र शोध घेतल्या नंतर तब्बल चार तासाने मुलांना त्यांच्या आईच्या ताब्यात दिले.